फ्लोपी, सीडी , डीव्हीडी,, पेन ड्राइव्ह आणि सध्या अनेकांकडे दिसणारा हार्डडिस्क ड्राइव्ह... कॉम्पुटरवरील माहिती साठविण्याची कालानुरूप बदलत गेलेली साधने सर्वाना माहित आहेतच . इंटरनेट मुले आता त्यात आणखी एका नव्या साधनाची भर पडली आहे. ते म्हणजे क्लाउड कॉम्पुटिंग. याच्या अनेक फायद्यांमध्ये माहिती साठविणे हा सर्वात मोठा फायदा आहे.
क्लाउड कॉम्पुटिंगचा गेल्या काही वर्षात उदय झाला आहे. बर्याच लोकांना हे माहित नाही, कि क्लाउड कॉम्पुटिंगचा सामान्य माणसांवर बराच मोठा परिणाम झाला आहे. तुम्ही आम्ही ज्या गोष्टी दहा वर्षापूर्वी करत होतो, त्या गोष्टी आता क्लाउडमुळे आपण वेगळ्या पद्धतीने करायला लागलो आहोत. एका वेगळ्या प्रकारच्या डिजीटल जीवनपद्धतीचा उदय यामुळे होत आहे.
संगणकशास्त्र मध्ये जेव्हा एखादी मोठी आणि किचकट सिस्टीम चित्ररूपाने दाखवायची असते, तेव्हा बर्याच वेळेला ढगाची प्रतिमा वापरतात. त्यातूनच 'क्लाउड कॉम्पुटिंग' हा शब्द आला आहे. एखादी खूप मोठी अशी सिस्टीम, कि ज्याच्याशी तुम्ही संपर्क करू शकता, ती तुम्ही वापरू शकता, पण ती सिस्टीम कशी बनली आहे अथवा त्याचे अंतरंग काय आहेत याची तुम्हना कल्पना नाही, अशा सिस्टीम साठी क्लाउड शब्द आता संगणक शास्त्रात वापरता येतो. उदाहरणादाखल आपण ईमेल चा विचार करू या. जवळ जवळ प्रत्येकाकडे गुगल किंवा याहु ईमेल चे अकौंट असतेच. तुम्ही दररोज ईमेल वापरता, पण हि ईमेल ची सिस्टीम बनवण्यासाठी गुगल आणि याहु काय सॉफ्टवेअर वापरते, त्याच्यासाठी त्यांनी जगभर सर्व्हरचे (शक्तिशाली संगणक) जाळे कसे विणले आहे याची तुम्हाला कल्पनाही नाही. गुगल आणि याहु हि एक सेवा तुमच्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. अशा प्रकारे क्लाउडच्या माध्यमातून सेवा उपलब्ध करून देण्यालाच बरेच वेळा 'क्लाउड कॉम्पुटिंग' असे म्हणतात; तसेच या मॉडेल ला 'सॉफ्टवेअर एज सर्व्हिस' असेही म्हटले जाते. अनेक वेळेला क्लाउडच्या माध्यमातून तुम्हाला हार्डवेअरहि उपलब्ध करून दिले जाते. म्हणजे तुमची कंपनी छोटीशी असेल तर तुम्हाला तुमची वेबसाइट अथवा सॉफ्टवेअर चालवण्यासाठी सर्व्हर विकत घ्यायची गरज नाही. ते क्लाउडवरून भाड्याने घेत येतात. जेव्हा हवे असेल तेव्हा हवे तेवढे सर्व्हर तुम्हाला एक बटन दाबून चालू करता येतात. या मॉडेल ला संगणक शास्त्रात 'इन्फ्रास्ट्रक्चर एज सर्व्हीस' असेही म्हणतात; परंतु क्लाउडचा सर्वात जास्त उपयोग सर्वसामान्य माणसांसाठी 'स्टोरेज' म्हणूनं जास्त होतो. म्हणजे तुमच्या फाइल तुम्ही तुमच्या संगणकावर स्टोअर करण्या ऐवजी त्या क्लाउडमध्ये - म्हणजेच क्लाउड सुविधा देणाऱ्या कंपनीने विणलेल्या सर्व्हरच्या जाळ्यावर स्टोअर करता...........................Continue next
3 comments:
Nice Information Sir 👍
Click here Computer Information technology Pdf free download
Good information Sir 👍
Click here Computer Information technology Pdf free download
Jardin Casino 22Bet Sign In For Sale
Jardin is a gambling air jordan 18 retro men blue from us site that offers a virtual sports betting experience as a way air jordan 18 retro red suede discount to enjoy a virtual sports real air jordan 18 retro red betting experience air jordan 18 stockx super site as air jordan 18 retro men red order a member of the
Post a Comment